महाराष्ट्रातील माॅन्सून आणखी लांबणीवर; वाचा किती दिवसांनी येणार माॅन्सून

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 जून 2019

मान्सूनच्या आगमनासाठी आणखी आठ दिवस वाट बघावी लागणार आहे. माॅन्सून यंदा तब्बल १५ दिवस उशीरानं येणार आहे. आधीच केरळमध्ये आठ दिवस उशीरानं आलेल्या माॅन्सूनची ‘वायू’ चक्रीवादळानं वाट अडवली आणि विदर्भात माॅन्सून १५ दिवसपर्यंत लांबलाय. यामुळं खरिप पेरणीवर परिणाम होणार असून शेतकरीही चिंतेत आहे.

राज्यात सध्या भीषण दुष्काळाचं चित्र आहे. तसंच उकाड्यानेही नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा पावसाकडे लागल्यात. आता ही मान्सूनची ही प्रतिक्षा लवकर संपो आणि लवकरात लवकर मान्सून बरसो अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. दरम्यान माॅन्सून 24  जूनपर्यंत महाराष्ट्रात येण्याचा अंदाज आहे.

WebTitle : marathi news monsoon updates monsoon delayed in maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live