राज्यातील 53.50% पुरुष आणि 42.50% महिला अविवाहित.. जाणून घ्या कारणं.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 जून 2019

देशात काय आणि राज्यात काय सध्या लग्न न करण्याचा ट्रेंड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण राज्यातले 53.50 टक्के पुरुष तर 42.50 टक्के महिला अविवाहित आहेत. यामागे अनेक कारणं आहेत. ती एकदा पाहुयात.

देशात काय आणि राज्यात काय सध्या लग्न न करण्याचा ट्रेंड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण राज्यातले 53.50 टक्के पुरुष तर 42.50 टक्के महिला अविवाहित आहेत. यामागे अनेक कारणं आहेत. ती एकदा पाहुयात.

  • ग्रामीण भागातून शहरी भागात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यांत होणाऱ्या स्थलांतरांमध्ये प्रचंड वाढ झालीय. 
  • आर्थिक किंवा शैक्षणिक कारणांसाठी ही स्थलांतर केली जात असून याचा सरळ परिणाम विवाहसंस्थेवर होतोय.
  • शिक्षण
  • कृषी संस्कृतीपासून दूर जाणं
  • नोकरीची जीवघेणी स्पर्धा या सगळ्यामुळं तरुण पिढीचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचं कळतंय.
  • दुसरीकडे शहरी भागात लिव्ह इन रिलेशनशीपच्या वाढत्या आकर्षणामुळं अविवाहितांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती मिळतेय. 

बरं तरुण तरुणींना या सगळ्याबाबत काय वाटते ते आम्ही जाणून घेतलं. या सगळ्यात विवाहसंस्था धोक्यात आलीय असा एक सूर उमटतो जो काही प्रमाणात खरा जरी असला तरी पुर्ण खरा नाही. कारण आता लग्न करायचं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, नाही का ?

Webtitle : marathi news more than fifty four and more than forty four percent unmarried respectively


संबंधित बातम्या

Saam TV Live