मोठी बातमी! भारत सरकारकडून बँकाच्या खासगीकरणाचा विचार, फक्त 5 सरकारी बँक ठेवणार?

साम टीव्ही
मंगळवार, 21 जुलै 2020
  • भारत सरकारकडून बँकिंग क्षेत्रात मोठे बदल?
  • देशात फक्त 5 सरकारी बँक ठेवण्याचा विचार
  • अर्ध्याहुन अधिक बँकाचं खासगीकरण होणार?

देशातल्या अर्ध्याहुन अधिक सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा विचार केंद्र सरकार करतंय..खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात फक्त 5 सरकारी बँका ठेवण्याचा विचार केंद्र सरकार करतंय. बाकी सर्व बँका खासगी हातात देण्याची योजनाही बनवण्याचा विचार असल्याची माहिती मिळतेय.
सूत्रांच्या माहितीनुसार बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, पंजाब एंड सिंध बँक या बँकाचं खासगीकरणात आधी नंबर लागणार आहे.

सध्याच्या कोरोनाच्या संकटात बँकांची आर्थिक स्थितीही मजबूत नाहीय..अशात आपले समभाग बाजारात विकणे हा उत्तम पर्याय असल्याचं सांगितलं जातंय. शिवाय रिझर्व बॅकेच्या म्हणण्यानुसार देशात ४ किंवा ५ सरकारी बँका असाव्या..त्यामुळं अर्थव्यवस्था सुलभ करता येईल..या प्रस्तावावर आता सरकार विचार करत असल्याचं कळतंय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live