लोकलमधील शेकडो प्रवासांपसून मृत्यू अवघ्या काही सेकंदावर होता पण... मोटरमनची थरारक कामगिरी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 जुलै 2018

अंधेरीतल्या पूल दुर्घटनेची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच जखमींना प्रत्येकी 1 लाखांची मदत घोषित केलीय. जखमींवरील सर्व खर्च रेल्वेमार्फत केला जाईल असंही त्यांनी सांगितलंय.

विशेष म्हणजे पूल दुर्घटनेनंतर प्रसंगावधान दाखवणारे मोटरमन चंद्रकांत सावंत यांचा रेल्वेमार्फत सन्मान करण्याची घोषणाही पियूष गोयल यांनी केलीय. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांनी अंधेरीतल्या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. 

'लोकलने अंधेरी स्थानक सोडले. तोपर्यंत गाडीने साधारणपणे 50 प्रतिकिमीचा वेग पकडला असेल. तेवढ्यात पुलाचा एक भाग कोसळताना दिसला आणि इमर्जन्सी ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली, हा अनुभव आहे शेकडो प्रवाशांना जीवघेण्या अपघातापासून वाचवणारे मोटरमन चंद्रशेखर सावंत यांचा. या अपघातात पश्चिम रेल्वेचे मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी दाखवलेल्या प्रसंगवधनामुळे अनेक प्रवाशांचे प्राण बचावले. 'काही सेंकदाचा फरक होता. पूल आणि लोकलमध्ये फक्त 60 ते 65 मीटरचे अंतर होते. आणखी काही सेंकद उशीर झाला असता तर वाईट प्रसंग ओढावला असता', असे सावंत यांनी सांगितले. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live