कॉंग्रेस पुरस्कृत खासदार नवनीत राणा यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जुलै 2019

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

काही दिवसापूर्वी खासदार राणा यांनी पती आणि आमदार रवी राणा यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. या भेटीची विशेषत: राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मोदींच्या भेटीनंतर खासदार राणा यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची मुंबईत भेट घेतली यावेळी त्यांचे पती रवी राणाही उपस्थित होते. 

नवनीत राणा यांनी त्यांना खासदार म्हणून मिळणारे पहिले वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे वेतन दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

WebTitle : marathi news MP navneet rana met maharashtra CM devendra fadanvis

संबंधित बातम्या

Saam TV Live