मोदींसमोर फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे तोंड उघडायचे धाडस होत नाही - राजू शेट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

तासगाव - पुर्वी आम्ही आंदोलने केली तर त्याची दखल घेतली जायची. काही ना काही मार्ग निघायचा. आता मात्र आंदोलने केली तर फक्त आश्‍वासने दिली जातात. मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगावे की गेल्या साडेचार वर्षांत दिल्लीतून शेतकऱ्यांचा कोणता प्रश्न सोडवून आणला ? दिल्लीत मोदींसमोर तोंड उघडायचे यांना धाडस होत नाही, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. साडेचार वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केले, याचा हिशेब मुख्यमंत्र्यासह भाजप-सेनेच्या कोणाही मंत्र्याने द्यावा, असे आव्हानही शेट्टी यांनी केले.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.  श्री.शेट्टी म्हणाले,"" कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यां विरोधात बोलायचो, टोकाचा विरोध केला. भांडणे व्हायची. आंदोलनावर सरकारमधील मंत्री चर्चेला बोलवायचे. माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून केंद्रात पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मिळायची. त्या प्रश्नावर काही ना काही निर्णय व्हायचा. शेतकऱ्यांसाठी मी भांडलो आणि यापुढेही भांडत राहणार. सत्ता कोणाचीही असो माझी बांधिलकी शेतकऱ्यांसाठी आहे. सत्तेशी नाही.'' 

काल इस्लामपूरच्या सभेत विश्‍वासघातकी शेट्टींना घरी बसवा असे आवाहन करणाऱ्या शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर टिका करताना शेट्टी म्हणाले," शेतकऱयांच्या आत्महत्येचा विषय असो अन्य सरकारविरोधी कोणतेही भूमिका उद्धव ठाकरे यांनी गेल्या चार वर्षात एकदा तरी सरकारच्या बाजूने वक्तव्य केले आहे का? त्यांची जुनी भाषणे खरी का आताची खरी हा प्रश्न पडला आहे, जुन्या भाषणाच्या पेपर मध्ये आलेल्या बातम्या आणि अग्रलेख वाचून त्यांचा तुम्ही अभ्यास करा म्हणजे तुम्ही काय म्हणत आहात हे तुम्हाला कळले तर बघा.'' 

Web Title: MP Raju Shetti comment
 
संबंधित बातम्या

Saam TV Live