रणजितसिंह मोहिते पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

रणजितसिंह मोहिते पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

अकलूज : खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहती पाटील उद्या भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहिर कऱण्यात आले. अकलूज येथे झालेल्य जाहिर सभेत रणजितसिंह यांनी याची घोषणा केली. यावेळी विजयसिंह मोहिती पाटील देखील उपस्थित होते. उद्या बुधवारी (ता. 20) दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. 

रणजितसिंहांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. अकलूज येथे झालेल्या जाहीर सभेत रणजितसिंहांनी ही घोषणा केली. यावेळी पाटील म्हणाले, राज्यसत्तेचा वापर समान्य माणसाला मोठे करण्यासाठी झाला पाहिजे. अशीच भूमिका आमची राहिली आहे आणि हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. आज राजकारण कशा पद्धतीने चालले याची जाणीव माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. राजकारण सत्ता मिळविण्यासाठीच करायचे ही आमची भूमिका कधीच नव्हती. वडिलांनी मुलाच्या हातात राजकारणाची सुत्र देण्यासाठी ही सभा नाही. गेल्या दहा वर्षापासून पुढच्या पिढीचे भविष्य घडणारी योजना पडून आहे. याचा दहा जिल्ह्यांचा ही योजना महत्त्वाची आहे. त्या योजनेचा वापर सत्तेसाठी केला पाहिजे. मागील दहा वर्षापासून योजनेची चेष्ठा सुरु आहे. 

भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांना ही योजना समजून सांगितले आहे. शेतकऱ्याचा, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आजची सभा आहे. विजयसिंह मोहती पाटील सत्तेत नसताना देखील अनेक योजना आपल्या जिल्ह्यांसाठी घेऊन आले आहेत. रेल्वे, रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुढील काळात लोकांना रोजगार हमी योजनेत जायचे नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच हे प्रश्न सोडवू शकतील. राज्यातील देंवेद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुरेश प्रभू, गिरीष महाजन हे सोडवतील. 
भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घ्यायचा का हे आता जनतेने सांगावे.... उद्या साडेबारा वाजता वानखेडे स्टेडीअम जवळील गरवारे जिमखाना येथे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी वेळ दिली आहे. तेथे सर्वांनी उपस्थित रहावे. आपण दिलेल्या आशिर्वादाची जाण ठेऊन मरेपर्यंत हा रणजितसिंह काम करीण.
Web Title: Ranjitsinh Mohite Patil will join BJP tomorrow

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com