महाराष्ट्राची 'लाल परी' झाली ७१ वर्षांची

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 जून 2019

मुंबई - महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली ‘लाल परी’ ७१ वर्षांची होत आहे. एसटीचा ७१ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १) राज्यातील विभागीय आणि जिल्हा पातळीवरील सर्व ५६८ एसटी स्थानकांत उत्साहात साजरा केला जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेल्या एसटीने काळानुसार कात टाकली असून, अनेक स्वागतार्ह बदलही स्वीकारले आहेत. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटी महामंडळाने सामान्यांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे आणि गरीब- वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, यासाठी एसटीने पुढाकार घेऊन प्रवासभाड्यात सवलती दिल्या आहेत. ‘लाल परी’पासून सुरू केलेला एसटीचा प्रवास आता ‘हिरकणी’, ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’ आणि ‘विठाई’ अशा सुखद टप्प्यांवर आला आहे.

Web Title: MSRTC ST 71st Anniversary

संबंधित बातम्या

Saam TV Live