कुबेरालाही लाजवेल इतकी संपती भारतातल्या एकाच व्यक्तीच्या नावावर 

कुबेरालाही लाजवेल इतकी संपती भारतातल्या एकाच व्यक्तीच्या नावावर 

हे आकडे ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. कुबेरालाही लाजवेल इतकी संपती भारतातल्या एकाच व्यक्तीच्या नावावर आहे आणि ती व्यक्ती म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी...बार्कलेस हुरुन इंडियानं नुकताच भारतीय श्रीमंताची यादी जाहीर केली. 

त्यानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किमतीत वर्षभरात 45 टक्के वाढ झालीय. मुकेश अंबानींच्या नावावर 3 लाख 71 हजार कोटींची संपत्ती असून त्यांच्या मिळकतीत दररोज 300 कोटींची वाढ होतीय. 

भारतातील श्रीमंतांच्या या यादीत सलग सातव्या वर्षी त्यांनी पहिला क्रमांक कायम ठेवलाय. विशेष म्हणजे मुकेश अंबानींची एकूण संपत्ती दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील श्रीमंतांच्या एकूण संपत्तीपेक्षाही जास्त आहे.

या यादीत एस पी हिंदुजा दुस्ऱ्या स्थानी असून  त्यांची संपत्ती १ लाख ५९ हजार कोटी इतकी आहे तर लक्ष्मीनारायण मित्तल  तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्या नावावर १ लाख १४ हजार ५०० कोटींची संपत्ती आहे तर अझिम प्रेमजी चौथ्या स्थानी असून त्यांची संपत्ती ९६ हजार १०० कोटी आहे. 

यावरून आपल्याला कल्पना येईल की मुकेश अंबानी आणि इतर उद्योगपतींच्या संपत्तीत किती तफावत आहे. 
1000 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंतांचा आकडा मागीलवर्षी 617  होता. तो आता 731 वर गेला आहे. या सर्व  श्रीमतांकडील एकूण संपत्ती ७१ हजार ९०० कोटी डॉलर्स आहे.

हा आकडा २ लाख ८४ हजार ८०० कोटी डॉलर्सच्या भारताच्या जीडीपीच्या ३३ टक्के आहे. या यादीत सर्वाधिक २३३ श्रीमंत आर्थिक राजधानी मुंबईतील आहेत. 
या आकडेवारीतून भारतीयांची श्रीमंती अधोरेखित होतीय. पण दुसरीकडे सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात अवघ्या 731 लोकांच्या हाती देशाची 33 टक्के संपत्ती एकवटणं ही बाब फारशी कौतुकास्पद नाही. 
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com