पुण्यात मुठा कालवा फुटल्याने झोपडपट्टीत पाणीच पाणी....तर भिजलेला संसार जमा करणं सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

काल पुण्यातील मुळा मुठा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं. तर सिंहगड रस्ता आणि दांडेकर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला.

यामध्ये अनेक लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जनता वसाहत आणि दांडेकर पुल वसाहत या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं.  अनेकांच्या घरातील सामान पाण्यात वाहून गेलं.

या पूरानंतर  या परिसरात रोगराई पसरण्याची होती भीती आहेच. घटनेला 17 ते 18 तास उलटल्यानंतरही स्थानिक नागरिक अजूनही बेघर आहेत. घरामधील पाणी काढत आहेत. वाहून गेलेल्या संसारातील काही मिळेल का या अपेक्षेने शोधही सुरू आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live