मोदीच व्हावेत पुढील पंतप्रधान : मुलायमसिंह

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : आमचे सर्व सदस्य लोकसभेत मोठ्या संख्येने निवडून येऊ शकत नाहीत. मात्र, तुमचे सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत आणि आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी आज (बुधवार) लोकसभेत सांगितले. 

मोदी सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात मुलायमसिंह बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधानपदी मोदी पुन्हा यावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आमचे सर्व सदस्य लोकसभेत निवडून येऊ शकत नाहीत हे आम्हाला माहीत आहे. मात्र, तुमचे सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत आणि आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत. त्यामुळे आता पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचे अभिनंदन.

दरम्यान, मुलायमसिंह यांनी हे वक्तव्य केल्याने लोकसभेत त्यांच्या वक्तव्यावरून भाजप खासदारांनी बाकं वाजवून प्रतिसाद दिला. 

संबंधित बातम्या

Saam TV Live