काँग्रेस-राष्ट्रवादीतील 50 आमदार भाजपच्या संपर्कात : गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट

काँग्रेस-राष्ट्रवादीतील 50 आमदार भाजपच्या संपर्कात : गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट

मुंबई : स्वत:चे अपयश लपवण्यासाठी शरद पवार भाजपवर आरोप करत आहेत. विरोधी पक्षातील म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीतील जवळपास 50 आमदार, नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

शरद पवार यांनी आज (रविवार) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून सत्ताधारी विरोधी पक्षातील नेत्यांना फोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यांनी स्वतःला यासाठी वाहून घेतल्याचे त्यांनी म्हटले होते. 

याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, की शरद पवारांनी भाजपवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, की आपले नेते पक्ष का सोडून जात आहेत. आम्ही कुणालाही धमकावलेले नाही किंवा कोणावरही दबाव आणलेला नाही. चित्रा वाघ यांच्याशी महिनाभरापूर्वीच बोलणे झाले होते. राष्ट्रवादीत भवितव्य राहिले नसल्याचे त्यांनी सांगितले होते. आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाई कायद्यानुसार सुरु आहे. सूडबुद्धीने कारवाई करायची असती, तर सुनील तटकरे, अजित पवारांवरही कारवाई केली असती. ते तर दिग्गज नेते होते. पण आम्ही नियमानुसार कारवाई केली. ईडी, सीबीआय चौकशीमध्ये मुख्यमंत्री कुठलाही हस्तक्षेप करत नाहीत. राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडू लागले आहेत, कुणाला घ्यावे असा प्रश्न आम्हाला पडला आहे. मात्र स्वत:चं अपयश लपवण्यासाठी पक्षांतराचं खापर भाजपवर फोडले जात आहे. शरद पवारांनी नावे घेतलेले सर्व नेते आम्हाला भेटून गेले आहेत. त्यांनी आम्हाला पक्षात घ्या अशी विनंती केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून 50-60 आमदार माझ्या संपर्कात आहेत. दोन तीन दिवसात हे चित्र स्पष्ट होईल. काँग्रेसची स्थिती अत्यंत वाईट आहे, आठवडाभरात राष्ट्रवादीची अवस्था त्यांच्यापेक्षा वाईट होईल.

Web Title: BJP minister Girish Mahajan attacks NCP chief Sharad Pawar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com