देशात भाजपचेच सरकार येईल आणि भाजपला 200 जागा मिळतील- नारायण राणे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 मार्च 2019

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी  पंतप्रधानपदी विराजमान होतील की नाही, याबाबत शंका आहे. मात्र, देशात भाजपचेच सरकार येईल आणि भाजपला 200 जागा मिळतील. पण पंतप्रधान कोण होईल, हे सांगता येत नाही. असे असले तरीही मोदी पंतप्रधान व्हावेत ही अपेक्षा आहे, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील किमान 5 जागा लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच लोकसभेसाठी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंविरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे मराठवाडा विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय नारायण राणे यांनी जाहीर केला. 

स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या पाच जागा लढविणार

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यात लोकसभेच्या एकूण पाच जागा लढविणार आहे. अन्य उमेदवार नंतर जाहीर करण्यात येतील. ज्या लोकसभा मतदारसंघात शिवसेना लढत आहे. तेथीलच हे उमेदवार असतील, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

Web Title: BJP will come To Power again in the country says Narayan Rane

संबंधित बातम्या

Saam TV Live