HDFC बँकेकडून कर्जाच्या दरात कपात

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 मार्च 2019

मुंबई: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने कर्जाच्या दरात कपात जाहीर केली आहे. बँकेने आता दोन वर्षे आणि तीन वर्षे कालावधीच्या कर्जांवरील 'एमसीएलआर'दर 0.05 टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेतला असून हे नवीन दर 7 मार्चपासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे दोन वर्षासाठीचा कर्जदर आता 8.85 टक्के तर तीन वर्षासाठी कर्जदर आता 9 टक्क्यांवर आला आहे. 

कर्जाचा कालावधी   बँकेचा कर्जदर 
एक दिवस  8.35 टक्के
एक महिना 8.4 टक्के
तीन महिने 8.45  टक्के
सहा महिने         8.55 टक्के
एक वर्ष  8.75 टक्के

रिझर्व्ह बँकेने गेल्या द्विमाही पतधोरणात व्याजदरात कपात केल्याने त्याचा फायदा ग्राहकांकडे हस्तांतरित करण्यात यावा असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांना सांगितले होते. त्यासाठी बँकेकडून सर्व बँकांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये बँकांना व्याजदरात कपात करण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

Web Title: HDFC bank announces cut in MCLR for 1 and 2 years tenure by 5 bps

संबंधित बातम्या

Saam TV Live