40 च्या बदल्यात 40000 पाहिजेत : आमदार जितेंद्र आव्हाड

40 च्या बदल्यात 40000 पाहिजेत : आमदार जितेंद्र आव्हाड

मुंबई- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले असून, पाकीस्तानला धडा शिकवा; 40च्या बदल्यात 40000 पाहिजेत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची ताकद मिळायला हवी. पाकीस्तानला याची जबरदस्त किंमत मोजायला लावली पाहिजे. अशावेळी राजकारण बाजूला ठेवायला पाहिजे. आपल्या चुकलेल्या धोरणांमुळे हे घडत असेल तर ही धोरणे सुधारण्याची गरज असल्याचे मतही यावेळी आव्हाड यांनी व्यक्त केले.

काश्मीरचा तरूण जर मुख्य प्रवाहातून बाहेर पडत असेल तर त्याला पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे हे आपले काम आहे आणि आपण सर्व भारतीयांनी मिळून ते काम राजकारण बाजूला ठेऊन करायला हवे. सर्व राजकारण्यांनी एकत्रित येऊन ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असेही ते म्हणाले.

Web Title: Jitendra Awhad Comment On Pulwama Attack

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com