मोनोचे नादुरुस्त डबे जूनअखेर पुन्हा कार्यरत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

मुंबई - आगीमुळे नादुरुस्त झालेले मोनोचे दोन डबे पुन्हा सेवेत दाखल होणार आहेत. डब्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून जूनअखेर ते पुन्हा कार्यरत होतील. त्यामुळे मोनोच्या दोन गाड्यांमधील वेळ लवकरच कमी होणार आहे. मोनोच्या प्रवाशांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत वाढ होण्याची शक्‍यता अधिक असल्याने, त्या काळात प्रवाशांच्या सोयीच्या सर्व उपाययोजना केल्या जाणार असल्याचे मोनो प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

नोव्हेंबर २०१७ मध्ये मोनोला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले होते. वडाळा कारशेडमध्ये डब्यांची दुरुस्ती अनेक दिवसांपासून सुरू होती. दहापैकी सात रेक कार्यरत झाले आहेत. दोन रेक तांत्रिक कामांमुळे बऱ्याच दिवसांपासून रखडले होते. त्यांचे सुटे भाग मलेशियावरून येणे अपेक्षित असल्याने, दुरुस्ती रेंगाळली होती. अखेरीस दुरुस्ती पूर्ण झाली असून जूनअखेर दोन्ही रेक प्रवासी सेवेत पुन्हा दाखल होतील, असे मोनोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याशिवाय नव्या १० रेकची खरेदी करण्याबाबतच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. हिताची, बंबार्डियर, सीआरआरसी आणि बीवायडी कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत उत्सुकता दर्शवली आहे. 

प्रवाशांसाठी स्थानकात बाके
मोनो स्थानकांत प्रवाशांना बसण्याची सोय नसल्याच्या अनेक तक्रारी प्राधिकरणाकडे आल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्याचा प्रश्‍नही मार्गी लावण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थानकावर बाकडी बसविण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Mono after one month in service

संबंधित बातम्या

Saam TV Live