मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे : दीपक केसरकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

मुंबई - मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

मुंबई - मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

या संदर्भात केसरकर यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच बैठक घेतली. या वेळी गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता, मराठा समाज शिष्टमंडळातील प्रतिनिधी राजेंद्र निकम, दिलीप पाटील, बाबा गुंजाळ, रूपेश मांजरेकर, संजय पाटील, विवेक सावंत, स्नेहा गावकर आदी उपस्थित होते. मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी होत होती. पोलिसांवरील हल्ले आणि तत्सम गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दिली होती. 

त्याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर; तसेच डॉ. रणजित पाटील या उपसमितीचे सदस्य आहेत. बैठकीत केसरकर यांनी सांगितले, की मोर्चेकऱ्यांवरील मागे घ्यावयाच्या गुन्ह्यांबाबत पोलिस महांचालकांकडून प्राप्त झालेला अहवाल विधी व न्याय विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. येत्या आठ-दहा दिवसांत पहिल्या टप्प्यातील अभिप्राय मिळाल्यानंतर उपसमितीची बैठक घेतली जाईल. त्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हे मागे घेण्यात येतील. 

Web Title: The cases filed against the Maratha revolution marches are back soon says Kesarkar


संबंधित बातम्या

Saam TV Live