मुंबई विद्यापीठाकडून परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 मार्च 2019

मुंबई - वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राचे व दुसऱ्या वर्षाच्या चौथ्या सत्राचे काही पेपर एकाच दिवशी आले आहेत. याबाबत युवा सेनेच्या अधिसभा सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विद्यापीठाने या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणाऱ्या तिन्ही शाखांमधील काही अभ्यासक्रमांच्या सत्र दोन पेपरच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. 

पहिल्या वर्षाच्या दुसऱ्या सत्राचे फाऊंडेशने कोर्सचे 2 मे रोजी होणारे पेपर 10 मे रोजी होतील. वाणिज्य शाखेच्या अकाऊंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंटचा पेपर 13 मे रोजी होईल. कला शाखेचे अरेबिक, फ्रेंच, जर्मन, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, पाली, पर्शियन, संस्कृत, सिंधी, उर्दू, प्राचीन भारतीय संस्कृती, अँथ्रोपोलॉजी, इकोनॉमिक्‍स, फिलॉसॉफी, पॉलिटिक्‍स हे 4 मे रोजीचे पेपर 9 मे रोजी, तर कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश हा 3 मे रोजीचा पेपर 13 मे रोजी होईल. 

विज्ञान शाखेतील ऍक्‍चुरियल सायन्स, बायोकेमिस्ट्री, बॉटनी, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्‍स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, जिओग्राफी, जिओलॉजी, ह्युमन सायन्स, लाईफ सायन्स, मॅथेमॅटिक्‍स, मायक्रोबायोलॉजी, फिजिक्‍स, सायकोलॉजी, स्टॅटिस्टिक्‍स, झूऑलॉजी -1 हे 3 मे रोजी होणारे पेपर 13 मे रोजी होणार आहेत. 

Web Title: Changes in the dates of the examination by the University of Mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live