Citizenship Amendment Bill | भाजपच्या शाळेचे आम्ही हेडमास्तर! राज्यसभेत राऊतांची सडेतोड टोलेबाजी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणारे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (बुधवार) राज्यसभेत या विधेयकावरील चर्चेदरम्यान जोरदार टीका करत पाकिस्तानची भाषा आम्हाला मंजूर नाही, ही पाकिस्तानची संसद नाही, असे म्हटले आहे.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यात यश आले होते. आज (बुधवार) हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले आहे. राज्यसभेत सरकारला इतर पक्षांची गरज पडणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे शिवसेना भाजपला राज्यसभेत मदत करेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

महाराष्ट्रात कमळ फुलणार; ठाकरे सरकार पडणार ?

या विधेयकावरील चर्चेदरम्यान राऊत म्हणाले, की हा देश धार्मिक नाही, मानवतेच्या आधारावर चर्चा झाली पाहिजे. ही पाकिस्तानची संसद नसून, पाकिस्तानची भाषा आम्हाला मंजूर नाही. या विधेयकाला विरोध केला तर देशद्रोही आणि पाठिंबा दिला तर राष्ट्रप्रेमी असे कसे होईल. देशभक्तीचे प्रमाणपत्र आम्हाला नको. देशाच्या अनेक भागात या विधेयकाला विरोध आहे. जबरदस्ती धर्मांतर केले जात आहे. मानवतेच्या विचारातून चर्चा व्हायला हवी. आपल्याला मजबूत पंतप्रधान आणि गृहमंत्री मिळाले आहेत, मग हे विधेयक मंजूर झाल्यानंतर देशातल्या घुसखोरांना बाहेर काढणार का? हिंदुत्वावर आम्हाला कुणाकडून धडे घ्यायची गरज नाही. हिंदुत्वाचा मुद्दा आम्हाला शिकवू नका. तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत.

Web Title: Sanjay Raut Criticize BJP In Rajyasabha, Says We are the headmaster of the school where the BJP Leard politicis

संबंधित बातम्या

Saam TV Live