बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी शंभर कोटींची तरतूद

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 जानेवारी 2019

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे बांधकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्यात येणार असून, त्यासाठी 100 कोटींचा खर्च करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

स्मारक उभारणीसाठी 100 कोटी खर्च अपेक्षित आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक या संस्थेची नोंदणी यापूर्वीच करण्यात आली आहे. स्मारकाच्या उभारणीसाठी बृहन्मुंबई महापालिकेकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक या संस्थेला महापौर बंगल्याची जागा भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. साधारण दोन वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण होण्याची शक्‍यता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्‍त केली. या स्मारकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. सल्लागाराने अंदाजित केल्यानुसार प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, एमएमआरडीएकडून या स्मारकाचे बांधकाम करण्यात येईल; तसेच त्यासाठी सुरवातीस 100 कोटींचा खर्चदेखील एमएमआरडीएच्या निधीमधून करण्यात येणार आहे.

Web Title: Provision of 100 crores for Balasaheb Thackeray memorial

संबंधित बातम्या

Saam TV Live