मुंबईत नाल्यात पडून 328 लोकांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 जुलै 2019

Mumbai : देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर हे लोकांसाठी धोकादायक ठरलं असून मुंबईत गेल्या 5 वर्षात मॅनहोल, गटारी आणि समुद्रात पडून 328 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आरटीआय मधून समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी यांनी यासंदर्भात पालिकेकडे गेल्या पाच वर्षातील दुर्घटनांची माहिती मागितली होती.पालिकेने दिलेल्या माहितीनुसार सन 2013 ते जुलै 2018 दरम्यान मॅनहोल,गटारी किंवा समुद्रात पडून मृत्यू झाल्याच्या एकूण 639 घटना घडल्या असून त्यात 328 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरात अश्या प्रकारे मृत्य होणं ही गंभीर बाब असून अश्या प्रकारची उघडी गटारे, मॅनहोल्स किंवा धोकादायक स्थळांकडे लक्ष देण्याचं आवाहन शकील अहमद यांनी पालिका आयुक्त प्रविणसिंग परदेशी आणि अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदले यांना पत्र लिहून केले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live