व्हाट्सअॅपच्या जगात ५ नवे भन्नाट फीचर्स

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 मार्च 2019

मुंबई : जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेंजर अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप दरवेळी आपल्या युजर्ससाठी काही ना काही नवनवीन फीचर्सचा आविष्कार करत असतात. जगभरात व्हॉट्सअॅपचे १. ३ बिलियन यूजर्स आहेत. सध्याच्या काळात व्हॉट्सअॅप फेक न्यूजच्या आहारी जात आहे. त्याला आळा बसवण्यासाठी मेसेज फॉरवर्डची मर्यादा कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर ५ नवीन फीचर्स लवकरच युझर्सच्या भेटीला येणार आहे. 
  
नवीन फीचर्स 
रिव्हर्स इमेज सर्च 
या फीचर्समुळे युझर्सला आपल्या चॅटबॉक्समध्ये आलेल्या फोटोची पडताळणी करता येईल. त्याचबरोबर तो फोटो खरा की खोटा या बद्दल गुगलवर जाऊन सर्च करता येणार आहे. 

डार्क मोड 
या फीचर्सद्वारे युझर्स आरामात तीव्र प्रकाशाच्या त्रासाशिवाय रात्रीच्या वेळी देखील व्हॉट्सअॅप वापरून बॅटरीची बचत करू शकतो. 

3 D टच अॅक्शन
या फिचरमुळे युझर्स दुसऱ्या युझरचे स्टेटस त्याला माहिती होऊ न देता वाचू शकणार आहेत. हे फिचर सध्या बीटा युझर्ससाठी उपलब्ध आहेत लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होणार आहेत. 

प्रायव्हेट रिप्लाय 
हे फिचर लवकरच ios मध्येही दिले जाणार आहे यामुळे युझर कोणत्याही ग्रुपचॅटमध्ये अन्य युझरला प्रायव्हेटमध्ये रिप्लाय करू शकणार आहे. 

ऑडिओ पिकर 
या फीचरच्या मदतीने अन्य युझरला ऑडिओ फाईल पाठवताना स्वतः ऐकू शकणार आहोत. सोबतच आपल्या फोनमधील म्युझिक फाईलची लिस्ट तयार होणार आहे. यामुळे युझर ३० फाईल एकत्रित पाठवू शकणार आहे.  

Web title :  5 different features in whatsapp new update

संबंधित बातम्या

Saam TV Live