बॅंका ‘केवायसी’साठी ग्राहकाच्या संमतीने आधारचा वापर करू शकतात : रिझर्व्ह बॅंक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 मे 2019

मुंबई -  बॅंका ‘केवायसी’साठी ग्राहकाच्या संमतीने आधारचा वापर करू शकतात, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. बॅंका आणि इतर वित्तीय सेवा कंपन्यांसाठी ‘केवायसी’चे सुधारित नियम रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केले आहेत.

मुंबई -  बॅंका ‘केवायसी’साठी ग्राहकाच्या संमतीने आधारचा वापर करू शकतात, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. बॅंका आणि इतर वित्तीय सेवा कंपन्यांसाठी ‘केवायसी’चे सुधारित नियम रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केले आहेत.

ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची यादी रिझर्व्ह बॅंकेने अद्ययावत केली आहे. यात खाते उघडण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांचाही समावेश आहे. वैध ओळखपत्रांच्या यादीत आता रिझर्व्ह बॅंकेने आधारचा समावेश केला आहे. सरकारी अंशदानाचा लाभ घेणाऱ्या ग्राहकाकडून बॅंकांनी आधार क्रमांक घ्यावा आणि ‘ई-केवायसी’ करावी. सरकारी अंशदानाचा लाभ न घेणाऱ्या ग्राहकाकडून वैध कागदपत्रांची प्रमाणित प्रत घ्यावी आणि त्याचे छायाचित्रही घ्यावे, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. याचबरोबर सर्व संस्थांनी सरकारी अंशदान न घेणाऱ्या ग्राहकांकडून ‘केवासी’साठी आधार क्रमांक घेतल्यानंतर तो प्रक्रिया झाल्यानंतर खोडून टाकावा, असे रिझर्व्ह बॅंकेने नमूद केले आहे.

बॅंक खाते आणि मोबाईल सिम खरेदीसाठी आधार वापरास परवानगी देणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारी महिन्यात परवानगी दिली होती.

Web Title: Aadhar card now can be used for Bank account KYC


संबंधित बातम्या

Saam TV Live