दिशापायी आदित्यने जोडले हात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

मुंबई : बॉलिवूडमधील कलाकरांना जितकी प्रसिद्धी मिळते, तेवढंच त्यांना ट्रोलही केले जात असतं. तसेच राजकारण्यांचेही असते. सध्या अभिनेत्री दिशा पटानी आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे एकत्र दिसले. यानंतर दोघांनाही सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी दिशा पटानीचा विषय निघताच आदित्य ठाकरेंनी हात जोडले. 

आज आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे. यावेळी एका पत्रकाराने आदित्य ठाकरेंना त्यांना काही खास व्यक्तींकडून गिफ्ट मिळाले का? असा प्रश्न विचारला. अप्रत्यक्षपणे हा प्रश्न दिशा पटानी संदर्भात होता. मात्र यानंतर आदित्य ठाकरे यांनी हसतच माध्यमांना हात जोडले. यानंतर एकच हशा पिकला.

web title: Aditya Thackeray added the hand

संबंधित बातम्या

Saam TV Live