VIDEO | मेट्रोविरोधात सेना आक्रमक, डेव्हलपर्सच्या गाड्यांची तोडफोड

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

मुंबई : मेट्रो 3 च्या रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कामामुळे गिरगावातील रहिवाशी अक्षरशः बेजार झाले आहेत.परिसरात सुरू असलेल्या मेट्रो 3 च्या त्रासदायक कामावरोधात शिवसेनेने दंड थोपटत आदोलनाचा इशारा दिला होता. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज डेब्रिजची ने आण करणारे डंपर फोडले तसेच डंपरमधील ड्रायव्हर आणि क्लिनर यांना  पळवून लावलं.

शिवसेनेनं मेट्रो तीन प्रकल्पा विरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू केलंय. आज गिरगावातील मेट्रो तीन प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या खोदकामांमुळे स्थानिक नागरिकांना जो त्रास होतेय त्या संदर्भात शिवसेनेने आंदोलन आक्रमक आंदोलन केले. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज त्रास होतोय, तसेच रहिवाशांना त्यांच्याच घरी येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या विरोधात शिवसेनेनं हे आंदोल केलं.

मेट्रो 3 चं काम प्रगतीपथावर आहे. गिरगांवाजवळ मोठा बोगदा करण्यात आला असून याठिकाणी पोकलेनने ड्रीलिंगच काम सुरू आहे. या कामामुळे आसपासच्या परिसराला हादरे बसत असल्याचा रहीवाश्यांचा आरोप आहे. शिवाय डेब्रिज उचलण्याची डंपरची ये-जा सुरू असून त्याच्या आवाजाने ही रहिवाशी त्रासले आहेत.

अनेकदा तक्रारी करून देखील तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. यामुळे शिवसैनिकांनी थेट रस्त्यावर उतरत आक्रमक आंदोलन केले.

Webtitle : agitation against metro three work in goregaon by shivsena party workers

संबंधित बातम्या

Saam TV Live