मुंबईकरांच्या पोटात दररोज जातोय तीन सिगारेटचा धूर !

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 जून 2018

मुंबई - वाढत्या प्रदूषणामुळे श्‍वास कोंडलेल्या मुंबईत प्रत्येक व्यक्तीच्या पोटात श्‍वसनाद्वारे धुळीतून तब्बल तीन सिगारेटच्या धुराएवढा घातक धूर जात असल्याचे विदारक चित्र आहे. शहरात फिरताना तीन सिगारेट ओढल्याइतकी प्रदूषित हवा तुमच्या प्रत्येक श्वासातून फुफ्फुसात जात आहे. महामुंबईतील माझगाव, नेरूळ आणि अंधेरीपाठोपाठ वांद्रे-कुर्ला संकुलात सर्वाधिक प्रदूषण असल्याचे ‘मुंबई सफर’च्या पाहणीत आढळून आले आहे. 

देशभरातील प्रमुख महानगरांमधील प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीमार्फत सेन्सर बसवण्यात आले आहेत. त्या सेन्सरमधून प्रत्येक मिनिटाची प्रदूषणाची पातळी नोंदवली जाते.

त्याअंतर्गत मुंबई आणि नवी मुंबईतील हवेत वर्षभरात सरासरी ५८ एकक पीएम २.५ एवढ्या प्रमाणात सूक्ष्म धूलिकण आढळतात. एका सिगारेटमध्ये २२ पीएम २.५ प्रकारचे धूलिकण असतात. त्यानुसार मुंबईतील हवेतून रोज सुमारे तीन सिगारेटचा धूर प्रत्येक नागरिकाच्या फुप्फुसात जात आहे. ४० एककापेक्षा अधिक प्रमाणात धूलिकण असल्यास ते मानवी आरोग्याला घातक मानले जाते.

माझगाव महामुंबईतील सर्वांत प्रदूषित ठिकाण आहे. माझगावाला वर्षभरात सरासरी ७७ एकक सूक्ष्म धूलिकणांची नोंद झाली आहे. म्हणजे साडेतीन सिगारेटचा धूर या भागातील नागरिकांच्या फुप्फुसात पोहोचत आहे.

एक सिगारेट म्हणजे ‘पीएम २.५’चे २२ मायक्रॉन प्रतिघनमीटर प्रमाण. दिवसभरात २२ मायक्रॉन प्रतिघनमीटर प्रदूषित हवा श्‍वसनातून फुफ्फुसात जाणे म्हणजे एक सिगारेट ओढण्याच्या बरोबरीचे आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live