मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी दोन दिवस दररोज सहा तास बंद राहणार  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुख्य धावपट्टी दुरुस्तीसाठी आजपासून दोन दिवस दररोज सहा तास बंद ठेवण्यात येत आहे. त्याचा परिणाम सेवेवर झाला असून 225 उड्डाणे रद्द करण्यात आली; तर 70 विमान सेवांच्या वेळेत बदल करण्यात आला. विमानतळ बंदचा सर्वाधिक फटका हा जेट एअरवेज व एअर इंडियाला बसला आहे. या कंपन्यांच्या 100 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. 

पावसापूर्वीच्या दुरुस्तीसाठी मुख्य धावपट्टी दोन दिवस सकाळी 11 ते 5 कामासाठी बंद ठेवण्यात येत आहे. या विमानतळावरून जेट एअरवेजच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान सेवांचे उड्डाण व आगमन होते. त्यामुळे या कंपनीच्या 70 उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यातील 54 विमान सेवा या राष्ट्रीय आहेत. एअर इंडियाने 34 विमानांचे उड्डाण रद्द केले. तसेच जेट एअरवेजने 17 आंतरराष्ट्रीय विमान सेवा उड्डाणांसह 70 उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल केला. 

दृष्टिक्षेप विमानळावर 
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वांत व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. येथील दोन धावपट्ट्यांपैकी मुख्य धावपट्टीवरून तासाला 48 विमानांचे आगमन व उड्डाण होते; तर दुय्यम धावपट्टीवरून तासाला 35 विमानांचे उड्डाण व आगमन होते. या विमानतळावरून दिवसाला सुमारे 970 विमानांचे उड्डाण  आणि आगमन होते. 

संबंधित बातम्या

Saam TV Live