मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात अखेर सुधारणा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात सुधारणा करण्याची मागणी अखेर केंद्र सरकारने मान्य केली आहे. 

 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' असा शिवरायांचा पूर्ण उल्लेख नावात करण्यात आला आहे. आधी  छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मुंबई विमानतळाची ओळख होती.

 मूळ नावात ‘महाराज’ हा शब्द जोडण्यात आला आहेत. नावात केलेल्या बदलामुळे महाराजांचा खऱ्या अर्थाने सन्मान वाढला आहे. या निर्णयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबुकवरील संदेशात म्हटले आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live