बाप्पांच्या विसर्जनासाठी मुंबापुरी सज्ज 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 सप्टेंबर 2018

दहा दिवस गणपतीची मनोभावे सेवा केल्यानंतर आज आपल्या लाडक्या बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन केले जाईल. यासाठी संपूर्ण मुंबापुरी सज्ज झाली आहे. सकाळपासून मुंबईतील चौपाट्यांवर बाप्पांच्या विसर्जनासाठी गर्दी होणार आहे. सकाळीच 8 वाजताच्या सुमारास गणेश गल्लीच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झालीये. दरम्यान, सकाळीच लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असून तब्बल 20 तासांपेक्षा अधिक वेळ मिरवणूक होणार आहे..

बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान बाप्पांवर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून बाप्पांचे स्वागत केले जाते. लालबाग परिसरात श्रॉफ बिल्डिंग जवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचा देखावा उभाण्यात आला आहे. तर चिंचपोकळी येथे स्थानिक हनुमान उत्सव मंडळाद्वारे विठ्ठलाच्या प्रतिकृतीद्वारे बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दरवर्षी मंडळांकडून तब्बल ४०० हून अधिक बाप्पांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली जाते. यंदाच्या वर्षी ६०० किलो फुले आणि ४०० किलो गुलालचा वापर केला जाणार आहे. तर पुण्यात 10.30 नंतर मानाच्या गणपतींची मिरवणूक निघण्यास सुरुवात होणार आहे. 

WebTitle : marathi news mumbai all set for ganesh immersion 

संबंधित बातम्या

Saam TV Live