येत्या 48 तासांमध्ये निर्णय घ्यावा; अन्यथा आम्ही प्रचाराला सुरवात करू -संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

मुंबई : 'लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची असेल, तर त्यासाठी 1995 मधील फॉर्म्युलाच हवा आहे. भाजपने यावर येत्या 48 तासांमध्ये निर्णय घ्यावा; अन्यथा आम्ही प्रचाराला सुरवात करू', असा इशारा शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी आज (गुरुवार) दिला. याशिवाय, 'देशाचा पंतप्रधान भाजपचा होणार असेल, तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा', अशी प्रतिक्रिया राऊत यांनी काल (बुधवार) 'साम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना अजूनही भाजप-शिवसेनेच्या युतीची बोलणी सुरू आहेत. यासंदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे राऊत यांनी हा इशारा दिला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा करत नवी खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है', असा सल्ला त्यांनी भाजपला दिला. 

भाजपच्या युतीबाबत राऊत म्हणाले, 'मी माझी भूमिका मांडत आहे. शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. लोकसभा असो की विधानसभा.. आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी आहे. आमच्या पक्षप्रमुखांनी स्वतंत्र लढण्याची तयारी केली, तर आम्ही लढू! युतीची चर्चा आम्ही सुरू केलेली नाही.. ही चर्चा ज्यांनी सुरू केली, त्यांना आम्ही भूमिका स्पष्टपणे सांगितली आहे.' 

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut gives ultimatum to BJP for alliance in Lok Sabha 2019

संबंधित बातम्या

Saam TV Live