पुण्यात बुधवारी मध्यम पावसाची शक्यता, तर मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 जुलै 2019

मुंबई : जूनच्या अखेरीला जोर धरलेल्या पावसाची संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार 'बॅटिंग' सुरू असताना आज (बुधवार) मुंबईत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर, पुण्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. 

मुंबईत गेले दोन दिवस झालेल्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले. मंगळवारी सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पावसाने धुमाकूळ घातला होता. शुक्रवारपर्यंत (ता. 5) संपूर्ण कोकणासाठी पावसाला अनुकूल वातावरण आहे. बुधवारपासून (ता. 3) पावसाला पुन्हा जोर येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

दक्षिण छत्तीसगड आणि नजीकच्या भागांत असलेली वाऱ्यांची चक्राकार स्थिती, तयार झालेला कमी दाबाचा पट्टा, अगोदरपासूनच दक्षिण गुजरातजवळ असलेली वाऱ्यांची चक्राकार स्थिती आणि जवळच्या भागांत समुद्रसपाटीवर पुरेसे बाष्प निर्माण करणाऱ्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. 

पुण्यात अतिवृष्टीचा इशारा नाही 
पुण्यात बुधवारी (ता. 3) मध्यम ते हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने मंगळवारी वर्तविली असून, पुढील चोवीस तासांमध्ये मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात मात्र अतिवृष्टीचा कोणताही इशारा नसल्याचे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

पुण्यात चोवीस तासांमध्ये मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडेल. म्हणजे एका दिवसात पुण्यात 15.5 ते 64.5 मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढत असल्याने पुढील दोन दिवस पावसाच्या सरी पडतील. काही वेळा मुसळधार सरींचीही शक्‍यता आहे; पण अतिवृष्टीचा असा कोणताही इशारा नाही, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्‍यपी यांनी दिली. 

राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये सर्वदूर म्हणजे 76 टक्के भागात पावसाची शक्‍यता आहे. त्यात कोकणात अतिवृष्टीची शक्‍यता आहे; तर विदर्भातही पावसाच्या जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील दोन दिवसांनंतर मात्र हा जोर कमी होईल. मराठवाड्याच्या काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची हजेरी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Mumbai and Pune rain prediction by IMD

संबंधित बातम्या

Saam TV Live