'महाराष्ट्र फडणवीसांना माफ करणार नाही'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

पुणे : सिंचन घोटाळ्यातील फाईल्स एसीबीने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र फडणवीसांना कधीही माफ करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एसीबीने काढलेल्या या पत्रात असलेले प्रकल्प लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. त्याचा सिंचन घोटाळ्याशी फारसा संबंध नाही. आणि ही क्लिन चीटसुद्धा नाही. परंतु अजित पवार यांना उप-मुख्यमंत्री केल्यानंतर घोटाळ्याच्या फाईल्स आज न उद्या बंद केल्या जातील यात काहीच शंका नाही'.

दरम्यान, विदर्भातील सिंचन घोटाळ्यातील नऊ फाईल्स आज(ता.25) लाचलुचपत विभागाकडून बंद करण्यात आल्या आहेत. त्यांनंतर अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लिन चीट दिली असल्याच्या बातम्या समोर आल्या. परंतु, यानंतर लाचलुचपत विभागाने खुलासा केला असून बंद केलेल्या फाईलींशी अजित पवार यांचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. फाईल बंद होणं ही रुटीन प्रोसेस असल्याचे एसीबीकडून सांगण्यात येत असले तरी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरच या फाईल कशा बंद झाल्या असा प्रश्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Web Title: Anjali Damania Criticse on Cm Devendra Fadanvis

संबंधित बातम्या

Saam TV Live