राज ठाकरेंना भाजपचा 'बघाच तो व्हिडीओ'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 एप्रिल 2019

मुंबई : गेली 20 दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असत्य मांडण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी 32 वेळा सणसणीत खोटं दाखविण्यात आले. राज यांना कोणत्याही अधिकृत ठिकाणावरून माहिती घेतली आणि खोटे दाखविण्याचा प्रय़त्न केला. आता तुमची पोलखोल आम्ही केली आहे. 19 प्रकरणांवर आम्ही आढावा घेतला आहे. सत्याच्या आधारावर राजकारण करणे ही आमची संस्कृती आहे. राज मित्रा खरंच तू चुकलास, अशी खंत मी मांडतो, असे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभा घेऊन भाजपच्या योजनांची पोलखोल केली होती. तसेच त्यांनी लाव रे तो व्हिडिओ असे सांगत मोदी सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांची माहिती दिली होती. भाजपने याचाच धसका घेऊन आता बघाच तो व्हिडिओ असा कार्यक्रम आयोजित केला. मुंबईतील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता.

आशिष शेलार म्हणाले, की आता बघाच तो व्हिडिओ या नावाने होणारी ही महाराष्ट्रातील ही पहिली सभा आहे. माझ्या आयुष्यातील ही अशा प्रकारची पहिलीच सभा आहे. टीका, विडंबन यांना आमचा विरोध नाही. टीकेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवय आहे. राहुल गांधी आणि अजित पवारांबद्दल हेच स्वाभीमानाचे पुतळे राज ठाकरे काय बोलतात हे बघाच. आमच्या सत्तेतील सदस्यांची संख्या ऐकून राज ठाकरे यांची पळता भुई थोडी होईल.

Web Title: Ashish Shelar criticizes Raj Thackeray

संबंधित बातम्या

Saam TV Live