BREAKING | 'यांनी' दाखल केली अयोध्येप्रकरणी फेरविचार याचिका

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात जमियत उलेमा ए हिंदने सोमवारी फेरविचार याचिका दाखल केली आहे. बहुसंख्य मुस्लिम हे फेरविचार याचिका दाखल करावी या मताचे आहेत असे जमियतचे प्रमुख मौलाना अर्शद मदानी यांनी याचिका दाखल करताना सांगितले. 

यावेळी बोलताना ते म्हणाले, की न्यायालयाने फेरविचार याचिका दाखल करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे आम्ही ही याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. जमियत उलेमा ए हिंदने मशिदीसाठी दिलेली पर्यायी पाच एकर जमीन स्वीकारण्यासही विरोध असल्याचे यापुर्वीच स्पष्ट केले होते. तर, जमियत प्रमाणेच ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाने देखील या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे जफरयाब गिलनी यांनी सांगितले, की आम्ही 9 डिसेंबरपूर्वी या प्रकरणी फेरविचार याचिका दाखल करणार आहोत. देशातील 99 टक्‍के मुस्लीमांना या निकालाच्या विरोधात याचिका दाखल करावी असे वाटत आहे. त्यामुळे आम्ही ही याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असे गिलानी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Ayodhya Case Supreme court

संबंधित बातम्या

Saam TV Live