(व्हिडिओ) नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 जानेवारी 2019

कर्मचाऱ्यांना काय मिळालं?
- बेस्ट कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून मिळणारी 10 टप्प्यांची वेतनवाढ तातडीनं लागू होणार
- बेस्ट आणि पालिकेचा अर्थसंकल्पाचं विलनीकरणाच्या निर्णयासाठी मध्यस्थाची नेमणूक झाली
- पगारवाढ, विलनीकरणाबद्दलच्या अंतिम तडजोडीसाठी तीन महिन्यांची मुदत; मध्यस्थ निर्णय घेणार
- संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही
- एकाही कर्मचाऱ्याचं वेतन कापलं जाणार नाही
- कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करणार नाही

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत असल्याची घोषणा करा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. याला कामगार युनियनचे नेते आणि वकील यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या कर्मचारी युनियनकडून अधिकृतरित्या संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

वडाळा येथील बेस्ट वसाहतीच्या मैदानात कामगारांचा मेळावा होणार झाला. या मेळाव्यात संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. एक तासात संप मागे घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर संप संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. वाटाघाटी करण्यासाठी मेडिएटरचे नाव ठरवण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला असून तूर्तास निवृत्त न्या. निषिता म्हात्रे यांच्या नावाची चर्चा न्यायालयाने केली. मात्र अंतिम नाव ठरलेले नाही.

वेतनवाढीबाबत उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अंतिम तडजोडीसाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. जानेवारी 2019 पासून कामगारांना 10 टप्प्यातील वेतनवाढ लागू करण्याचेही प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. 

कर्मचाऱ्यांना काय मिळालं?
- बेस्ट कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून मिळणारी 10 टप्प्यांची वेतनवाढ तातडीनं लागू होणार
- बेस्ट आणि पालिकेचा अर्थसंकल्पाचं विलनीकरणाच्या निर्णयासाठी मध्यस्थाची नेमणूक झाली
- पगारवाढ, विलनीकरणाबद्दलच्या अंतिम तडजोडीसाठी तीन महिन्यांची मुदत; मध्यस्थ निर्णय घेणार
- संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही
- एकाही कर्मचाऱ्याचं वेतन कापलं जाणार नाही
- कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करणार नाही

संबंधित बातम्या

Saam TV Live