मोठी बातमी! ठाकरे सरकार मंगळवारी कर्जमाफीची घोषणा करणार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी कर्जमाफी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी 28 तारखेला दादरच्या शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिवांकडून शेतकरी कर्जमाफीबद्दलचं वास्तव काय आहे याची माहिती मागवली. यानंतर पुढील काही बैठकांमध्ये सातत्याने शेतकरी कर्जमाफी कशा प्रकारे दिली जाऊ शकते याबद्दल बैठका झाल्याची माहिती समोर आली. 

याच पार्शभूमीवर राज्यातलं ठाकरे सरकार येत्या मंगळवारी म्हणजेच (3  डिसेंबर) ला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. आजची बहुमत चाचणी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ बैठक घेतली. यानंतर माध्यमांना उद्या ( ता 01, डिसेंबर ) रोजी सविस्तर माहिती देईन असं वक्तव्य केलंय.   

ठाकरे सरकारवर फडणवीसांची टीका...

शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडून सुमारे 10 हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं जाऊ शकतं. सकाळ माध्यम समूहाच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्नशील असून त्याबाबतचा अहवालही त्यांनी मागवला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासादायक मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. 

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचं आश्वासन दिलंय. अशात आता येत्या मंगळवारी  म्हणजेच (3  डिसेंबर) रोजी  किंवा त्याआधी खरंच शेतकऱ्यांसाठीची गोड बातमी येतेय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.   

WebTitle : biggest decision of farmers loan wavier might be taken on third of december
 
संबंधित बातम्या

Saam TV Live