शिवसेना आणि मित्रपक्ष एकत्रच लढू; राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 जुलै 2019

मुंबई : आज आम्ही विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेताना कोणालाही मंत्रिपदाची आश्वासने दिलेले नाही. धाक आणि प्रलोभने देऊन पक्षात प्रवेश करून घेतलेला नाही. फक्त त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिवसेनेसोबत आम्ही विधानसभेत एकत्र लढणार असून, पुन्हा राज्यात युतीचेच सरकार येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने मास्टरस्ट्रोक मारत विरोधी पक्षातील चार आमदारांना आपल्या पक्षात समावून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, वैभव पिचड या तीन आणि काँग्रेसच्या कालिदास कोळंबर या एक आमदारावे प्रवेश केला. मुधकर पिचड, चित्रा वाघ यांनीही यावेळी भाजप प्रवेश केला. 

पक्षात येणाऱ्यांना कोणतेही आश्वासन दिलेले नाही ः मुख्यमंत्री
भाजपमध्ये येण्यास अनेक जण इच्छूक आहेत. या  नेत्यांनी प्रवेश केला असला तरी आम्ही शिवसेना आणि मित्रपक्ष एकत्रच लढू. मला विश्वास आहे, की राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल. महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घ अनुभव असलेले मधुकर पिचड आज भाजपमध्ये येत आहेत. पिचड यांचा अनुभव भाजपसाठी फायद्याचा ठरेल. महाराष्ट्राला अस्मिता, स्वराज मिळवून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपमध्ये सहभागी होत आहेत. संदीप नाईक यांनी प्रवेश केल्याने त्यांच्यासोबत त्यांच्या वंडिलांचे आशीर्वादही येतील. त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांना पकडले. देशात सामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचे काम पंतप्रधान मोदी करत आहेत. देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. 

Web Title: BJP and Shivsena contest assembly election together says Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Saam TV Live