राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांचा आम्हाला फायदा : विनोद तावडे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मे 2019

मुंबई : राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांचा आम्हाला फायदा झाला, असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. त्यामुळे राज्यातील 48 पैकी 37 ते 40 जागा आम्ही जिंकू असा दावा तावडे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध ठिकाणी सभा घेत भाजपचा परावभ करण्याचे आवाहन केले होते. राज यांनी राज्यभरात दहा प्रचारसभा घेत धमाल उडवून दिली होती. त्यांच्या प्रचाराचा कॉंग्रेस आघाडीला लाभ होणार असल्याची शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्‍त केली जात असतानाच राज ठाकरेंच्या या सभांचा भाजपलाच फायदा झाला असे विनोद यांनी म्हटले आहे.

"मुंबईत दीड-दोन तास रांगेत उभे राहुन लोकांनी मतदान केले. मतदारांना कारण विचारले तर त्यांनी सांगितले "की मोदी आले पाहिजेत म्हणून आलोत, राहुल गांधी-राज ठाकरे काहीही बोलतात. याचा परिणाम म्हणुन कोणी त्यांना मत दिली तर अडचण नको म्हणुन आम्ही मतदानाला आलो आहोत", असे आपल्याला लोकांनी सांगितल्याचा दावा तावडे यांनी केला.

Web Title: BJP leader Vinod Tawde says Raj Thackerays rallies benefit for BJP Shivsena

संबंधित बातम्या

Saam TV Live