भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली तर... 150 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार

भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली तर... 150 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रलंबित पडलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला आहे. त्याचा राजकीय फायदा भाजपला मिळणार असून, सुमारे पाच टक्‍के इतकी मते पक्षाकडे झुकली आहेत. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 150 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार आहेत, असे पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. यामुळे शिवसेनेबरोबरची युती तोडून 2014 प्रमाणे दोन्ही पक्षांनी वेगवेगळे लढावे, यासाठी भाजपमधील एक गट सक्रिय झाला असल्याचे सूत्रांकडून समजते.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि इतर घटकपक्ष महायुतीच्या झेंड्याखाली लढले होते. त्याआधी भाजपने चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत लांबवत ऐनवेळी शिवसेनेबरोबरील युती तोडून स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवली होती. याचा लाभ भाजपला त्या वेळी झाला आणि 123 जागा मिळवत भाजपने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केली. याचप्रमाणे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतदेखील भाजपने स्वबळावर लढावे. मागील खेपेस तयारी नसताना राज्यात भाजपचे सर्वाधिक 123 आमदार निवडून आले.

या वेळेस केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार विक्रमी जागा जिंकून दुसऱ्यांदा विराजमान झाले आहे. तर, राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला असून, मराठा समाजाच्या आरक्षणाचा कळीचा मुद्दा सोडविला आहे. यामुळे भाजपच्या मतात पाच टक्‍के इतकी वाढ होऊ शकते, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. याच आधारे राज्यात भाजपने सर्व 288 जागा स्वबळावर लढविल्या, तर नक्‍कीच 150 पेक्षा जास्त जागा जिंकून येण्याची खात्री भाजपमधील काही धुरिणांना वाटते. त्यामुळे शिवसेनेबरोबरची युती तोडावी, असे या गटाला वाटत आहे.

विजयी उमेदवारांना प्राधान्य द्यावे
भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी, या मताच्या भाजपमधील गटाचे म्हणणे आहे, की ज्या ठिकाणी भाजपची ताकद कमकुवत आहे, अशा ठिकाणी इतर पक्षातील ताकदवर उमेदवाराला पक्षप्रवेश देऊन ती जागा बळकट करावी. कॉंग्रेस, राष्ट्रवादी या विरोधी पक्षांतील अनेक आजी आणि माजी आमदार तसेच ताकदवान राजकीय घराणी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगेत आहेत. त्यांना पक्षात प्रवेश द्यावा व स्वबळावर सरकार स्थापन करावे, असे म्हणणे या गटाचे आहे.

Web Title: BJP may be elected independently in assembly election maharashtra
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com