शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर?

शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर?

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा देण्याच्या अटीवर राष्ट्रपतीपदाची ऑफर देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या वृत्ताला कोणाकडूनही अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नसून, शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात चर्चा सुरु असतानाच आज हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे जाऊ नये, यासाठी भाजपचे दिल्लीतील नेतृत्व सक्रिय झाल्याचे समजते. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करत असून सतत शरद पवारांच्या संपर्कात आहेत, तसेच शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर देण्यात आली आहे. भाजपाने राष्ट्रवादीसमोर नवा फॉर्म्यूला मांडला असून त्यानुसार, जुलै 2022 मध्ये शरद पवारांना राष्ट्रपतीपद आणि राज्यातील सत्तेत मोठा वाटा देण्याचे आणि केंद्रात दोन मंत्रीपदे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. तसेच आज होणाऱ्या  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. संजय राऊत यांनी 4 ते 5 दिवसांत सरकार स्थापन होईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सत्तेसाठी धडपडणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तसेच पवारांबाबतचे वृत्तही निराधार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: BJP may be gives president candidate offer to NCP chief Sharad Pawar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com