मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी भाजप-शिवसेना मध्ये तिढा कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जून 2019

 मुंबई : विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात एकच प्रश्न सध्या केंद्रस्थानी आहे. राज्याचे पुढील मुख्यमंत्रीपद कोणत्या पक्षाला मिळणार आणि किती कालावधीसाठी. दोन्ही पक्ष आपल्याकडेच मुख्यमंत्री राहावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. अर्थात मतदारांच्या मनात काय आहे हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजप या दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विधानसभेवेळीही आम्ही युतीनेच लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. दोन्ही पक्ष समसमान जागांवर लढतील, असे ठरल्याचे सांगण्यात आले. पण मुख्यमंत्रीपदाचे काय हा प्रश्न अनुत्तरितच होता. शिवसेनेलाही राज्यात मुख्यमंत्रीपद हवे आहे. पण भाजप आपल्याकडील मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. त्यामुळे हा तिढा तूर्त तरी सुटलेला नाही. 

 In BJP-Shiv Sena, they retained the Chief Minister's post

संबंधित बातम्या

Saam TV Live