आज भाजपमध्ये 'महाभरती'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 जुलै 2019

राष्ट्रवादीच्या तीन, तर कॉंग्रेसच्या एका आमदाराचा राजीनामा 
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याचे सत्र विरोधी पक्षांच्या आमदारांनी अवलंबले आहे.

राष्ट्रवादीच्या तीन, तर कॉंग्रेसच्या एका आमदाराचा राजीनामा 
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याचे सत्र विरोधी पक्षांच्या आमदारांनी अवलंबले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वैभव पिचड, संदीप नाईक आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी तर कॉंग्रेस पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर या चार आमदारांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिला. हे सर्व आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये या "मेगा भरती'चा कार्यक्रम बुधवारी मुंबईत गरवारे क्‍लब येथे होण्याची शक्‍यता आहे. या वेळी भाजपमध्ये विरोधी पक्षांतील अनेक नेते, कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. 

राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यातील अकोल्याचे आमदार वैभव पिचड, नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघाचे आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक, सातारा जिल्ह्यातील सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा दिला आहे. पिचड, नाईक आणि कोळंबकर यांच्या राजीनाम्यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. 

संग्राम जगताप - नगर; अवधूत तटकरे - श्रीवर्धन; कैलास चिकटगावकर - वैजापूर; ज्योती कलानी - उल्हासनगर; सिद्धराम म्हेत्रे - अक्कलकोट; जयकुमार गोरे - माण खटाव, अब्दुल सत्तार - सिल्लोड, भारत भालके - माळशिरस, राणा जगजितसिंह पाटील - उस्मानाबाद या आमदारांचीदेखील भाजप प्रवेशाची चर्चा आहे.

Web Title: BJP today Mega Recruitment


संबंधित बातम्या

Saam TV Live