दोन उकडलेली अंडी 1700 रुपये !

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मुंबई - पंचतारांकित हॉटेलात उकडलेल्या दोन अंड्यांसाठी सतराशे रुपये घेण्यात काहीही अवैध नाही. हॉटेल व्यावसायिकांवर 18 टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारण्याचे निर्बंध आहेत, असा दावा फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने केला आहे.

मुंबईतील एका तारांकित हॉटेलात दोन उकडलेल्या अंड्यांची किंमत सतराशे रुपये आकारण्यात आली होती. यापूर्वी अभिनेता राहुल बोस यालाही दोन केळ्यांसाठी सुमारे साडेचारशे रुपये बिल देण्यात आले होते.

अनेक मोठ्या हॉटेलांत ऑम्लेटच्या दरानेच अंड्याचे अन्य पदार्थही मिळतात. अंड्याच्या बऱ्याच पदार्थांची नावे (उदा. अंडा भुर्जी) मेन्यू कार्डमध्ये नसतात; मात्र दर तोच असतो. काही हॉटेलांत उकडलेले अंडे असा पदार्थच नसतो. त्यामुळे असा वेगळा पदार्थ मागितल्यास अंड्याच्या इतर पदार्थांचा दर आकारला जाईल, असे असोसिएशनचे उपाध्यक्ष गुरुबक्षीशसिंग कोहली यांनी "सकाळ'ला सांगितले.

नियमानुसार रोज सात हजार 500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दराच्या खोल्या असलेल्या हॉटेलांना ग्राहकांना दिलेल्या अन्नपदार्थांवर 18 टक्के जीएसटी आकारावा लागतो. त्यामुळे दुकानातील फळांवर जीएसटी आकारला जात नाही; मात्र पंचतारांकित हॉटेलांमध्ये अख्खे फळ किंवा त्याच्या फोडींवर जीएसटी लागू आहे, असे असोसिएशनचे सहसचिव प्रदीप शेट्टी यांनी सांगितले. ग्राहकांनी मेन्यू कार्डात नसलेले खाद्यपदार्थ मागवल्यास हॉटेल व्यवस्थापनांनी संवेदनशीलपणे अशा घटना हाताळाव्यात, अशा सूचना दिल्याचे असोसिएशनच्या पत्रकात म्हटले आहे.

फळभाज्यांची खरेदी-विक्री हा पंचतारांकित हॉटेलांचा मुख्य व्यवसाय नाही. मंडईत बाजारभावाने फळे मिळतात; पण वातानुकूलित हॉटेलांत खाद्यपदार्थांबरोबरच पार्किंग, अन्य आदरातिथ्य सेवा (दार उघडण्यासाठी दारवान इ.), दर्जा, प्लेट-कटलरी, निर्जंतुक केलेली फळे, आरामदायी वातावरण पुरवले जाते. त्यामुळे रस्त्यावर 10 रुपयांना मिळणारी कॉफी या हॉटेलांत अडीचशे रुपयांना मिळते.
- गुरुबक्षीशसिंग कोहली, उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया

Web Title: Boiled Egg 1700 Rupees Hotel GST Hotel Organisation

संबंधित बातम्या

Saam TV Live