मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 मे 2019

मुंबई - मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या मुंबईतील मार्गिकेच्या कामाने वेग घेतला आहे. बीकेसी ते ठाण्यातील शीळ फाटा या २१ किमी बोगद्याची निविदा काढण्यात आली आहे. ही महाराष्ट्रातील पहिली निविदा असून, या निविदेच्या तांत्रिक बाबींची निश्‍चिती ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर २१ किलोमीटर बोगदा खणण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या २१ किलोमीटर बोगद्यापैकी ७ किमीचा भाग हा ठाण्याच्या खाडीखालून जाणार आहे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपानकडून एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. बीकेसी ते शीळ फाटादरम्यानच्या बोगद्याच्या खोदकामासह दोन मार्गांच्या चाचणी आणि प्रत्यक्ष मार्ग सुरू करण्याच्या कामांचा या टेंडरमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी तांत्रिक निविदा ऑगस्ट २०१९ पर्यंत अंतिम होणार असून, प्रत्यक्ष काम २०२० मध्ये सुरू होणार आहे.

Web Title: Bullet Train Work Progress mumbai to ahmedabad

संबंधित बातम्या

Saam TV Live