दिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्या पाच टक्के जास्त

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 मार्च 2019

नवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले आहे. मुंबईमध्ये एका किलो मीटरमध्ये कारची संख्या 510 एवढी असते. हे प्रमाण दिल्लीपेक्षा पाच ट्क्के जास्त आहे. दिल्लीमध्ये प्रति किलेमीटर कारची संख्या एकशे आठ एवढी आहे.

मुंबईनंतर सर्वात जास्त कार पुणे शहरात आहेत. पुण्यात प्रति किलोमीटर 359 कारची संख्या आहे. कोलकातामध्ये हे प्रमाण 319 कार, चेन्नईमध्ये 297 कार तर बंगळूरुमध्ये 149 एवढे हे प्रमाण आहे. संबंधित राज्यातील परिवहन मंडळांकडून हे आकडे गोळा करण्यात आले आहेत.

परिवहन तज्ज्ञ अशोक दातार यांनी, जर कारच्या खरेदीवर लगाम नसेल तर काही काळातच रस्त्यावर चालणे देखील अवघड होईल असे म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने कारच्या वाढत्या संख्येमुळे पार्किंग आणि प्रदुषणाची समस्या वाढत असल्याचे म्हटले आहे.

परवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2016मध्ये मुंबईमध्ये प्रति किलोमीटर 430 कार होत्या. परंतु, आता वाढलेल्या कारच्या संख्येमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर यामुळे वाहतुकिचा वेग 10 किमी/तास येवढा असतो. 

Web Title: mumbai car density is 5 times that of delhi

संबंधित बातम्या

Saam TV Live