प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांना पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांना पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

मुंबई - व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यंदा प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीचे प्रवेश घेण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. असमर्थ ठरणाऱ्या विद्यार्थ्याला तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरल्यास खुल्या वर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे.

इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्‍चर आदी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.१७) सुरू होत आहे, तर एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यास लवकरच सुरवात होणार आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास यंदा वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना यापूर्वी विलंब होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश देण्यात येत असे. यानुसार मुदत वाढवून दिली जात असे. यंदा सर्वोच्च न्यायालयाने पडताळणी प्रमाणपत्र दुसऱ्या यादीतील प्रवेश घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सादर करणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले.  प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या शनिवारी पार पडलेल्या बैठकीत जात पडताळणी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध करून द्यावेत, यासाठी समाज कल्याण आणि आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोणत्या तारखेपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल, हे स्पष्ट होणार आहे. प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाचा लाभ घेताना विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे. प्रमाणपत्र सादर न केल्यास आरक्षणातील प्रवेश रद्द झाल्यास याची जबाबदारी स्वत:ची असेल, असे हमीपत्र विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. आरक्षणातील प्रवेश रद्द झाल्यास पात्रतेनुसार पुढील फेरीत खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागेल.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये, यासाठी आम्ही आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विहित मुदतीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन करत आहोत. विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रे प्राप्त करून घ्यावीत. 
- आनंद रायते, सीईटी सेल आयुक्त

Web Title: Caste Checking Time Table Student Admission

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com