मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 जुलै 2019

ऐन सकाळच्या वेळी मध्य रेल्वेवर मुलुंड स्थानकात झाडाची मोठी फांदी ओव्हरहेड वायरवर पडल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड स्थानकावर फलाट क्रमांक एकवर शनिवारी सकाळी ही घटना घडली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कल्याणच्या दिशेने जाणारी डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. 

दुसरीकडे जोगेश्वरीजवळ एक भाजी घेऊन निघालेले ट्रक पलटी झाल्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळते.

Web Title:  mumbai central railway suburban traffic disrupted

संबंधित बातम्या

Saam TV Live