पुन्हा भाजचेच सरकार; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

भाजपकडून विधानसभा निकालांच्या विश्लेषणासाठी मुंबईत तीन बैठकी पार पडल्या. कालपासून  या बैठका सुरु होत्या. नुकतेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आलेत अशात मुख्यत्त्वे निकालांचं विश्लेषण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या बैठका झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 

भाजपकडून विधानसभा निकालांच्या विश्लेषणासाठी मुंबईत तीन बैठकी पार पडल्या. कालपासून  या बैठका सुरु होत्या. नुकतेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आलेत अशात मुख्यत्त्वे निकालांचं विश्लेषण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या बैठका झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 

भाजप हा महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष राहिलाय. यात भाजपला  1 करोड 42 लाख मते मिळाली आहेत. भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसला 92 लाख आणि शिवसेनेला 90 लाख मते मिळाली आहेत. अशात भाजपकडे अपक्ष आमदार पकडून एकूण 119 आमदारांचं संख्याबळ आहे. महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकत नाही अशी भावना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली. जादुई आकड्यामुळे पुन्हा भाजचेच सरकार येणार असा विश्वास  चंद्रकांत पाटील यांना आहे. 

ओल्या दुष्काळावर चर्चा :  
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी चर्चा झाल्याचं स्पष्ट केलंय. महाराष्ट्रातील शेतकर्यांना 23 हजार कोटींचे  विमा कव्हर आहे.  यातील अधिकाधिक पैसे शेतकर्यांना लवकरात लवकर मिळाले तर मोठा दिलासा  मिळेल. यावर बोलताना केंद्र आणि राज्याने मदत करायला हवी, अशी भावना चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषदेत मांडली.  

'माफी मांगो आंदोलन' 
कालच राफेल संबंधी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. याबाबत सुप्रीम राहुल गांधी यांनी माफी मागावी असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. याच पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी म्हणून माफी मांगो राहुल गांधी असं आंदोलन भाजप आता राबवणार आहे.

बूथ लेव्हलला मजबूत करणार : 

भाजप महाराष्ट्रात बूथ लेव्हलला अत्यंत मजबूत पक्ष आहे. त्यामुळेच भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष राहिलाय. अशात आता बूथ लेव्हलवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून काम करणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलंय. 

WebTitle : chandrakant patil believes that BJP will form government in maharashtra 


संबंधित बातम्या

Saam TV Live