मंकी हिलच्या कामामुळे, सर्वसामान्यांचे हाल होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

आपल्याला गावी जायचं असेल तर आपण कमीत-कमी एक महिन्याआधीच रिझर्व्हेशन करतो...
जेणे करुन आपला प्रवास सुखकर व्हावा. पण प्रवासाचं प्लॅनिंग करण्याआधी आता एकदा रेल्वेचं वेळापत्रकावर 
नजर मारा. आपली रेल्वे रद्द तर झाली नाही ना याची शहानिशा करुन घ्या. मुंबई-पुणे असा प्रवास करणाऱ्यांची 
संख्या मोठी आहे. यात अनेक विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. काही जण तर प्रत्येक दिवशी मुंबई पुणे अप-डाऊन करत असतात.
त्यामुळे हे वेळापत्रक बघूनच प्रवासाचं प्लॅनिंग करा. अन्यथा तुमचा खोळंबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

15 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत मुंबई पुणे दरम्यान रेल्वेप्रवास करण्याचं सहसा टाळावं लागणार आहे. कारण रेल्वेच्या 
वेळापत्रकात बिघाड झालाय. या वेळापत्रकात बदल करण्याचा मध्य रेल्वेनं निर्णय घेतलाय. याला कारण ठरलंय, ते कर्जतजवळील आणि मंकीहिल
या घाटक्षेत्रातील दुरुस्ती.
 
कर्जत आणि मंकी हिल अशा घाट क्षेत्रादरम्यान रेल्वेची विविध कामं पार पडणारेत. हे काम 10 दिवस सुरू राहणार आहे.
मुंबई ते पुणे, पंढरपूर, भुसावळ आणि नांदेडसह अन्य गाड्यांचे वेळापत्रक बिघडणार आहे.

नेमक्या कोणकोणत्या गाड्या रद्द झालेल्या आहेत?

मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस रद्द

मुंबई-पंढरपूर फास्ट पॅसेंजर रद्द

मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर रद्द
  
पनवेल-नांदेड स्पेशल गाडी रद्द

कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस रद्द

या कालावधीत कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर धावेल.

हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस-हुबळी एक्स्प्रेस

मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस 

पनवेल-नांदेड एक्स्प्रेस पनवेलऐवजी पुण्यातून नांदेडसाठी धावेल.

नांदेडहून येणारी गाडी पुण्यापर्यंतच धावेल. 

Web Title :: changes in mumbai pune trains schedule

संबंधित बातम्या

Saam TV Live