मुंबईकरांसाठी खूशखबर ! 'बेस्ट' बससेवा स्वस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

मुंबईतील बेस्टचा प्रवास आता पूर्वीपेक्षा स्वस्त झाला आहे. बेस्ट प्रशासनाने तिकीट दरात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी घेतला. या नव्या निर्णयानुसार ५ किलोमीटर अंतरासाठी  ५ रुपये किमान भाडे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी किमान आठ रूपये भाडे आकारण्यात येत होते. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज बेस्ट समितीने शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी ऐतिहासिक घोषणा केली. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवआणि बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर देखील उपस्थित होते.  

बेस्टच्यावतीने नव्याने तयार करण्यात आलेल्या भाडेदराच्या प्रस्तावात प्रौढ आणि लहान मुलांसाठी आता समान भाडे आकारले जाणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. बेस्टचे भाडे कमी केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. ‘बेस्ट’ काम कसे करता येईल, यावरच आमचा भर आहे. बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयामुळे २० रुपयांत मुंबईत कुठेही जावू फिरणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: Mumbai City Bus Service revised best ticket ac and non ac bus fare

संबंधित बातम्या

Saam TV Live